मानसिक क्षमता कसोटी 
            
            
                
                    
                        मानसिक क्षमता कसोटी, ज्याला Mental Ability Test (MAT) असेही म्हटले जाते, हा एक अत्यंत
                        महत्त्वाचा विषय आहे. पूर्वी याला बुद्धिमत्ता कसोटी (Intelligence Test) असे संबोधले
                        जात होते. याचा शालेय अभ्यासक्रमात थेट समावेश नसला तरी, बहुतेक सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये
                        याचा समावेश असतो. या विषयाला निश्चित असे ठराविक अभ्यासक्रम नाही, ज्यामुळे वयोगटाचे
                        बंधन नाही; म्हणजेच, १२ ते १३ वयोगटातील विद्यार्थ्यांना तसेच २० ते २५ वयोगटातील व्यक्तींना
                        या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. काठिण्य पातळीमध्ये थोडाफार फरक असू शकतो, परंतु
                        मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या विविध मानसिक क्षमतांची चाचणी घेणे आहे.
                    
                    
                        या विषयात विद्यार्थ्यांच्या खालील मानसिक क्षमतांची चाचणी घेतली जाते:
                    
                    
                        - १) तर्कशुद्ध विचार करणे
 
                        - २) विश्लेषण करणे
 
                        - ३) सूक्ष्म निरीक्षण करणे
 
                        - ४) कल्पनाशक्ती
 
                        - ५) आकडेमोड कौशल्य
 
                        - ६) बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारख्या मूलभूत गणिती प्रक्रिया
 
                        - ७) सर्व सामान्य ज्ञान
 
                        - ८) सारासार विचार शक्ती
 
                    
             
                 
                
             
             
                   
                        सामान्यतः, सर्व प्रश्न बहुपर्यायी असतात, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला चार पर्यायी
                        उत्तरे दिलेली असतात. विद्यार्थ्यांनी त्या पैकी सर्वात बरोबर पर्याय निवडायचा असतो.
                    
                    
                        या विषयात उत्तम यश प्राप्त करण्यासाठी वरील सर्व क्षमतांचा विकास आवश्यक आहे. याशिवाय,
                        शालेय विषय, खेळ, विविध कलाप्रकार यामध्ये उत्तम यश प्राप्तीसाठीही या मानसिक क्षमतांचा
                        विकास महत्त्वाचा ठरतो.
                    
                    
                        या पुस्तकात वरील सर्व क्षमतांची चाचणी घेणारे प्रश्न कसे विचारले जातात आणि त्यांची
                        उत्तरे कशा प्रकारे सोडवायची याचे विवेचन केलेले आहे. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न प्रथम
                        स्वतः विचार करून सोडवावेत आणि नंतर उत्तराची पडताळणी करावी. जर उत्तरे जुळत नसतील,
                        तर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे त्यांची मानसिक धारणा
                        अधिक प्रगल्भ होईल.